मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलल्याचा एटीएसचा दावा; दोघांना अटक

मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी एटीएसला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणी दोन आपोरींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे, तर एका बुकीचा समावेश आहे. मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचं गूढ उकल्याचा दावा एटीएसने केला आहे. 

अटक केलेल्यामध्ये आरोपींमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याचा समावेश आहे. विनायक शिंदे लखनभैय्या एन्काऊंटर केसमधील आरोपी आहे. कोविड काळात कोर्टाच्या निर्णयानंतर विनायक शिंदला फर्लोवर बाहेर सोडण्यात आलं होतं. मनसूख हिरण हत्याप्रकरणात विनायक शिंदेचा हात आहे, असा एटीएसचा दावा आहे.   

दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या दोघांचा या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती, याचा तपास एटीएस घेत आहे. या प्रकरणात आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola