Pune : मनोहर मामा भोसले पुणे पोलिसांच्या ताब्यात, बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून फसवणुकीचा आरोप

Continues below advertisement

मनोहर मामा भोसलेसह इतर दोघांनी फसवणूक केल्याबद्दल बारामती तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय..  मनोहर भोसले यांच्या विरोधात शशिकांत खरात यांनी तक्रार दाखल केली आहे... शशिकांत खरात हे बारामती तालुक्यातील गोजुबाबी इथलं रहिवासी आहेत.  शशिकांत खरात यांच्या वडिलांना थायरॉईड आणि कॅन्सर झाला होता.. त्यांच्या वडिलांवर  उपाय करण्यासाठी उंदरगावला शशिकांत खरात हे त्यांच्या वडिलांना घेऊन गेले. 

मनोहर मामा भोसले यांनी स्वतः बाळू मामांचा अवतार असल्याचा बनाव केला. खरात यांच्या वडिलांना झालेल्या कॅन्सरवर उपाय म्हणून बाभळीच्या पाला,साखर आणि भंडारा खाण्यास देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.. शशिकांत खरात यांची मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी वेळोवेळी 2 लाख 51 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार खरात यांनी बारामतीत पोलिसांना दिली आहे.. मनोहर मामा भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंद कायदा अंतर्गत यांच्यावर बारामती तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय.. त्यामुळे मनोहर मामा भोसले यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram