Corona Center Rape Case | पनवेलमधील कोरोना सेंटरमध्ये बलात्काराची घटना | नवी मुंबई

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी झगडते आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. यानुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयितांना किंवा हाय रिस्क रुग्णांना क्वॉरंटाईनची व्यवस्था कोण येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा सूत्रांकडून सांगण्यात येत असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर एका विकृत तरुणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola