Pune : प्रेमसंबधाच्या संशयातून दोन मुलींची हत्या करुन बापाची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना
पिंपरी चिंचवड : पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाने त्याच ट्रक खाली आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली. मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरू आहेत आणि ती व्हॉट्सअॅपवर त्या मुलाशी संवाद साधते. या संशयावरून अख्ख कुटुंब संपवण्याचा प्रयत्न बापाने केला. सुदैवाने लहान मुलगी आणि पत्नी यातून बचावले आहेत. भरत भराटे असं निर्दयी मृत बापाचं नाव आहे. तर 18 वर्षीय नंदिनी आणि 14 वर्षीय वैष्णवी या दोन्ही मुलींची त्याने हत्या केलीये. या घटनेपूर्वी बापाने एक चिट्टीही लिहून ठेवली आहे. त्यात मुलीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करत अख्ख कुटुंब संपवत असल्याचं नमूद आहे.