Pune Gun Firing | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, पोलीस घटनास्थळी
Continues below advertisement
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे पोलिस आयुक्तालयाच्या दरम्यान असलेल्या फुट पाथवर एका बांधकाम व्यवसायिकाची गोळीबार करुन हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. राजेश कानाबार असं या 64 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून एका जागेच्या वादातून हत्येचा हा प्रकार घडलेला असू शकतो असा पोलिसांना अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलंय.
Continues below advertisement