#KangnaRanaut कंगना रनौतच्या अडचणी आणखी वाढल्या? गीतकार जावेद अख्तर यांचाही अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. आधीच मानहानीचे खटले कमी होते की काय, म्हणून आता गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला होता. यामध्ये तिने एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली आहेत. या व्हिडिओला यू ट्यूबवर लाखो हिट्स मिळाल्या आहेत. मात्र, "या संवेदनशील प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर धादांत खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून मला नाहक प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा", अशी मागणी जावेद अख्तर यांनी या दाव्यामध्ये केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola