Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या पालिकेच्या उद्यानात एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एक तरुण आणि तरुणी उद्यानात फोटो काढत असताना आठ ते दहा अल्पवयीन मुलांनी त्यांची छेडछाड केली आणि या वादातून या तरुण तरुणीला बेदम मारहाण केली आहे. कालची (20 नोव्हेंबर) ही घटना असून या तरुण तरुणीच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडीओ काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून समाज माध्यमात तो प्रचंड व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. घाटकोपर पोलिसांनी तक्रार दाखल होताच आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
कुर्ल्याच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी महिलेने काय काय म्हणाली? (Mumbai News)
काल चार साडेचारच्या दरम्यान काही मुलांचा गोंधळ इथे झाला. मुलाला काहीजण मारत होती. पैसे मागत होती. मी वरतून फक्त मारहाण होताना बघितलं. त्याच्यानंतर मुलाला मारहाण करत पलीकडे घेऊन गेली. मला नंतर काय झालं माहिती नाही. पण मोठा गोंधळ काळ झाला. इथे सुरक्षा रक्षक नसतात. गर्दुल्ले येतात पण आम्हाला त्रास देत नाहीत. नशाबाजी इथे होते कोणीही सुरक्षारक्षक नसतो, असं प्रमोद महाजन गार्डनमध्ये काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.