Kalyan Old man beating woman : 80 वर्षीय पत्नीला मारहाण करणाऱ्या मारकुट्या आजोबांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण : घरगुती वादातून आपल्या 80 वर्षीय वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. एबीपी माझाने बातमी प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. घरातून कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनीच आयपीसी कलम 323, 324, 504, 506 अंतर्गत  गजानन बुवा चिकनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गजानन बुवा चिकनकर यांचा पोलीस शोध घेत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola