आर्थिक फसवणूक प्रकरणी शेतकऱ्याची 2019मधील घटना,सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबळकरांचं नाव,न्यायाची मागणी

उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने दिलीप ढवळेंना मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप ढवळे 59 वर्षांचे होते. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola