Jammu Kashmir Pahalgam Attack|जम्मू-काश्मीर पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला,शोधकार्य सुरू

Jammu Kashmir Pahalgam Attack|जम्मू-काश्मीर पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला,शोधकार्य सुरू

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला केला असून त्यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात हा हल्ला करण्यात आला असून त्या  ठिकाणी सुरक्षा रक्षक पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमरनाथ यात्रेला काही दिवसात सुरूवात होत असतानाच हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ज्या पर्यटकांवर हल्ला झाला ते पर्यटक हे राजस्थानचे असल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने हिंदूंच्या विरोधात भडकाऊ भाषण दिलं होतं. त्यानंतर लगेच जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्याची घटना घडली.  हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला आहे, किती दहशतवादी यामध्ये सामील होते याची माहिती अद्याप समोर आली नाही. 

अमरनाथ यात्रा येत्या काहीच दिवसात सुरू होणार आहे. त्या आधी हा दहशतवादी हल्ला झाल्याने चिंता वाढली आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola