Parambir Singh | IPS अधिकारी परमबीर सिंह रजेवर जाण्याची शक्यता, उचलबांगडी झाल्यानंतर सिंह नाराज?
मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता परमबीर सिंह यांची बदली झाली आहे.