Dahisar Murder | मुंबईत अंगावर काटा आणणारी घटना, प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या मुलीसमोरच पतीची हत्या
मुंबईत अंगावर काटा आणणारी एक संतापजनक घटना घडलीय. आईने प्रियकराच्या मदतीने आपल्याच 6 वर्षाच्या मुलीसमोर मुलीच्या वडिलांच्या शरीराचे तुकडे केले आणि घराच्या किचनमध्ये खड्डा करुन पुरले. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडालीये. धक्कादायक म्हणजे पत्नीने आपल्या पतीचा खून केला आणि तो गायब आहे याची तक्रारारही पत्नीने दिली होती. पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वच्या खान कंपाउंड येथून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा खुलासा एका सहा वर्षाच्या चिमुकलीनं केला आहे. तिच्या आईनं मुलीसमोरच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.