Satara : दिलीप मोहिते पाटलांच्या बदनामीचा प्रयत्न फसला,सातारा तालुका पोलिसांकडून तिघांवर गुन्हा नोंद
पुणे : पुण्यातील खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा कट फसला आहे. हनी ट्रॅपमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न होता. सातारा तालुका पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हनी ट्रॅपसाठी आमदारांच्या जवळचा असणाऱ्या त्यांच्याच भावकीतील शैलेश पाटील यांचा हात असल्याचं समोर आलं आहे.