Ram Rahim Singh : गुरमित राम रहिम सिंहच्या शिक्षेवर सुनावणी, Ranjit Singh हत्याप्रकरणी शिक्षेची सुनावणी
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहिम सिंहच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. डेराचा माजी व्यवस्थापक रणजित सिंहच्या हत्येप्रकरणी ही शिक्षा सुनावली जाणार आहे. 2002 साली झालेल्या हत्येप्रकरणी कोर्टाने गुरमित राम रहिम सिंहला दोषी ठरवलंय. डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह हा राम रहीमचा शिष्य होता. 2002 मध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. डेरा मुख्यालयात कशाप्रकारे महिलांचं लैंगिक शोषण होत आहे यासंबंधी सांगणारं एक निनावी पत्र सगळीकडे फिरत होतं.
या पत्रामागे रणजीत सिंह याचा हात असल्याचा संशय असल्याने हत्या करण्यात आली होती. 2017 मध्ये दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राम रहिमला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. सध्या त्याला रोहतकमधील जेलमध्ये ठेवण्यात आलंय. दोन वर्षांपूर्वी पत्रकार राम चंदर छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी राम रहिमला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आलीय.