Vikas Dubey Thane Connection | विकास दुबेचा साथीदार गुड्डन त्रिवेदीला ठाण्याच्या कोलशेतमधून बेड्या
कानपूर पोलीस हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी विकास दुबेचा निकटवर्ती अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन त्रिवेदी याला महाराष्ट्र एटीएसने मुंबईला लागून असलेल्या ठाण्याच्या कोलशेत परिसरातून अटक केली. गुड्डन ठाण्यात त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी लपला होता. अटकेनंतर गुड्डनने पोलिसांना सांगितले की, खून झाल्यानंतर तो एक रात्र कानपूर येथील त्याच्या ड्राइव्हरच्या घरात लपला होता आणि दुसर्या दिवशी त्याच्या चालकासह तो मध्य प्रदेशातील दतिया येथे पसार झाला. या दोघांनी आपली गाडी दतियामध्ये सोडली. मग तेथून ते एका ट्रकमधून महाराष्ट्रातील पुण्यात आले आणि पुण्याहून दुसर्या ट्रकमध्ये गुड्डन व त्याचा चालक सुशील तिवारी ठाण्यातील आपल्या गावकरीच्या घरी आले.
Tags :
Bauva Dubey Mahakal Temple Ujjain Mahakal Temple Prabhat Mishra Vikas Dubey Friend Guddan Dubey Don Vikas Dubey Amar Dubye Vikas Dubey Ujjain Special Report