Cyber Crime :ऑक्सिजन सिलेंडर,रेमडेसिव्हीरच्या नावावर फसवणूक, बिहारमधील आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी एका अशा आंतर राष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय जी टोळी तुमची गरज ओळखून तुम्हाला टार्गेट करुन तुमची फसवणूक करत होती. ॲाक्सिजन सिलेंडर, रेमडिसिव्हर इंजेक्शन, हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून देतो, लस मिळावून देतो असा स्वरुपाच्या खोटे फोन खोटी जाहिरात करुन ही टोळी देशात अनेकांची फसवणूक करत होती. या करता ही टोळी सोशल मिडियाचा वापर करत होती.