Deepali Chavan Suicide : आत्महत्येपूर्वी दीपाली यांची चार पानी सुसाईड नोट, काय लिहिलं होतं नोटमध्ये?
नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्याला आज नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवकुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते डीएफओ पदावर कार्यरत आहे. आज नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने शिवकुमार यांना ताब्यात घेतले आहे.