Offensive Post | मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंविरोधी आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍या महिलेविरुद्ध मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. सुनयना होले असं या महिलेचं नाव आहे, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर विभाग या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात चौकशीला अडथळे आणण्याच्या विषयावरून ही पोस्ट लिहिली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola