सहकार विभागाच्या परीक्षेत बनावट परीक्षार्थी; पहिल्या आलेल्या परीक्षार्थीचं बिंग फुटलं

Continues below advertisement
सहकार व पणन विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या परीक्षेत बनावट परीक्षार्थी बसवणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीचा एक सदस्य मूळ परीक्षार्थीच्या जागी परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायला जायचा. तो त्याच्या कपड्यात लपलेल्या स्पाय कॅमेऱ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो आपल्या सहकाऱ्यांना पाठवायचा. मग त्याचे दोन सहकारी औरंगाबादमध्ये बसून प्रश्नांची उत्तर फोनद्वारे सांगायचे आणि नागपुरात परीक्षा केंद्रावर बसलेला त्यांचा सहकारी सगळी उत्तरे लिहायचा. सहकार आणि पणन विभागाच्या 2020 च्या परीक्षेत इंद्रजित बोरकर नावाचा परीक्षार्थी 200 पैकी 178 गुण घेऊन पहिला आला होता. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्या प्रमाणपत्रांच्या तपासणीवेळी त्याची स्वाक्षरी परीक्षा केंद्रावरील स्वाक्षरीसारखी नसल्याने अधिकाऱ्यांची शंका बळावली. त्यामुळं अधिक चौकशी केल्यानंतर हे बिंग फुटलं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram