Antilia Explosives Scare | स्फोटक प्रकरणात नव्या लँडक्रूझर आणि मर्सिडीज कारची एन्ट्री

बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी अंबानी स्फोटक प्रकरणातल्या दोन नव्या गाड्यांची. 26 फेब्रुवारीला सचिन वाझे मनसुख हिरण यांना घेऊन ज्या लँडक्रूझर गाडीतून सीपी ऑफिसला आले होते ती गाडी आता एनआयएनं ताब्यात घेतलीय. काल रात्री ही गाडी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. MH02 CC 101 असा या गाडीचा नंबर आहे. दुसरीकडे एनआयएनं आणखी एक मर्सिडीज कारही ताब्यात घेतलीय. ही गाडीसुद्धा सचिन वाझेच वापरत असल्याचा संशय एनआयएला आहे..या गाडीची फॉरेन्सिक चाचणीही होण्याची शक्यता आहे. MH 43 AR 8697 असा ताब्यात घेतलेल्या गाडीचा नंबर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola