धुळे येथे मद्यधुंद महिलेने उचलला पोलिसांवर हात, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत रस्त्यावर तमाशा
Continues below advertisement
मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा टोलनाक्याजवळ एका महिलेने मद्यप्राशन करून धिंगाणा घातला असल्याचा हा प्रकार घडला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी विचारपूस सुरु केली असता महिलेने पोलिसाची कॉलर पकडली. त्यांना धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार तिथे उभे असलेला पोलीस कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता.
Continues below advertisement