Vikas Dubey Associates Encountered | गुंड विकास दुबेचे पाच साथीदार एन्काऊंटरमध्ये मारले गेले

उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये 8 पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. हत्याकांडानंतर आठवडाभर विकास दुबे फरार होता. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात विकास दुबे सकाळी दर्शनासाठी आला. तिथल्या सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आतापर्यंत विकास दुबेचे पाच साथीदार मारले गेलेत. पोलीस हत्याकांडांनंतर गुंड प्रेमप्रकाश पांडे आणि अतुल दुबे मारले गेले होते. त्यांनंतर काल अमर दुबेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. तर आज आणखी दोन साथीदारांना पोलिसांनी मारलं. प्रभात मिश्रा आणि बउवा दुबे अशी त्यांची नावं आहेत. विकास दुबे याला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या पोलिसांवर त्याच्या गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात पोलीस अधिकाऱ्यांसह आठ पोलीस मारले गेले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola