Dharavi : टूथपेस्टऐवजी उंदीर मारण्याच्या विषारी पेस्टनं घासले दात, 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

मुंबई : आपण कुणीही ब्रश करुनच आपल्या दिवसाची सुरुवात करतो. मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खाननं रविवारी सकाळी ब्रशवर पेस्ट घेतली आणि दात घासण्यास सुरुवात केली. मात्र ती सकाळ अफसानाच्या आयुष्यातली शेवटची सकाळ ठरली. कारण अफसानानं अनावधानानं टूथपेस्टच्या ऐवजी उंदीर मारण्यासाठी वापरली जाणीर विषारी पेस्ट ब्रशवर घेतली होती. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवल्यामुळं हा धक्कादायक प्रकार घडला आणि यामध्ये अफसाना खानचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola