Yavatmal | यवतमाळमध्ये वाळू तस्कऱ्यांचा नायब तहसिलदार, तलाठ्यावर चाकूने हल्ला, हल्लेखोर फरार

उमरखेड -  ढाणकी रोडवर गो. सी. गावंडे कॉलेज जवळ उमरखेड तहसिल चे नायब तहसिलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे हे वाहनांची तपासणी करीत असताना  अचानकपणे रेती तस्करांकडून नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर चाकू हल्ला झाला त्यात  यांच्या पोटात चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना तात्काळ नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर तलाठी सुरोशे यांच्याही छातीजवळ किरकोळ जखम झाली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola