Chandrapur : अंडेविक्री व्यावसायिकाच्या घरात दरोडा, दरोड्यातील 1 कोटी 73 लाखांची रक्कम जप्त
चंद्रपूर शहरात उच्चभ्रू वस्तीत पडलेल्या दरोड्यातील 1 कोटी 73 लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तर, 5 आरोपींना अटक केलीय. चंद्रपूर शहरातील अरविंदनगर येथील ठोक अंडेविक्री व्यावसायिक खालिद कोळसावाला यांच्या घरी बुधवारी दरोडा पडला. संध्याकाळी 2 वृद्ध महिला घरी असताना चाकू, पिस्तुलाचा धाक दाखवत चौघांनी घरातील दिवाणात लपवलेल्या रोख रकमेच्या पिशव्या घेऊन पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात. मात्र या व्यावसायिकाकडे एवढी मोठी रक्कम आली कशी? परिवारातील कुणी यात सामील होते का? या प्रश्नांची पोलिस सध्या उकल करत आहेत.