Mansukh Hiran Murder Case : मिठी नदीत सापडलेली 'ती' नंबर प्लेट औरंगाबादची
मुंबई : मनसुख हिरण हत्येच्या दिवशी सचिन वाझे यांचं रात्रीचं Exclusive सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या फुटेजमध्ये सचिन वाझे 4 मार्चला रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी डोंगरी पोलीस स्टेशनला पोहचल्याचं दिसतंय. एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, सचिन वाझे जाणिवपूर्वक या पोलीस स्टेशनला आले होते, कारण चौकशी झाली तर हा व्हिडीओ आपल्या बाजूने पुरावा म्हणून त्यांना वापरता आला असता. हाच व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.