#BlackMagic मंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका निर्माण होण्यासाठी पालघरमध्ये जादूटोणा, दोघांना अटक
Continues below advertisement
राज्याचे नगरविकास मंत्री ठाण्याचे पालकमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलीय. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्रमगड मधील कऱ्हे तलावली येथून एका घरातून दोघांना ताब्यात घेतलं असून हे दोन्ही मांत्रिक हे एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर जादू टोना आणि अघोरी प्रथा करत होते. कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी अशी आरोपींची नाव असून त्यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यात भांदवी कलम 420, 34 फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी , अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादू टोना प्रतिबंध अधिनियम 2013 च्या कलम 2(1)(ख), (2) (3), 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पालघर मधील शिवसेनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Continues below advertisement