वाझे प्रकरणावरून राजकीय संघर्ष? परमबीर सिंगांना आयुक्तपदावरून हटवल्यानंतर भाजपचा शिवसेनेचा निशाणा
मुंबई : सचिन वाझे यांचे तीन अर्ज मंगळवारी (16 मार्च) एनआयए कोर्टाने फेटाळून लावले आहेत. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही नाही, सरकारी अधिकाऱ्याला अशाप्रकारे अटक करता येत नाही, अटकेची प्रक्रिया बकायदेशीर आहे हे दावे एनआयए कोर्टाने फेटाळून लावले. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने अंशत: मान्य केली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीच्यावेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे.