Bhiwandi Robbery : बुरखाधारी महिलांकडून सराफा दुकानातून लूट, CCTV च्या आधारे महिलांचा शोध
Continues below advertisement
भिवंडीत सोनेचांदी विक्रीच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी व्यापाऱ्यांची नजर चुकवून तब्बल 42 ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना घडली आहे . भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेत सरगम ज्वेलर्स असून या ठिकाणी दि 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दोन बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या असता वेगवेगळे दागिने पाहण्यासाठी दुकानातील कामगारां कडे मागत असतानाच कामगारांची नजर चुकवून समोर ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या या महिलांनी स्वतः जवळ लपवून खरेदी न करताच निघून गेल्या.
Continues below advertisement