Female Feticide | जेलची हवा खाल्ल्यानंतरही सुदाम मुंडेचा काळा धंदा सुरूच, स्त्री भ्रूण हत्येचा पर्दाफाश

Continues below advertisement

सुदाम मुंडे, स्त्री भ्रूण हत्येचा तो कलंकित चेहरा ज्याने हजारो कच्च्या कळ्या पोटातच खुडण्याचे पाप केले होते. त्याच्या पापाचा घडा भरला तो 2012 साली. अवैध गर्भपातावेळी एका महिलेचा मृत्य झाला आणि सुदाम मुंडेला दहा वर्षाची शिक्षा झाली. यातील बहुतांश शिक्षा भोगल्या नंतर सहा महिन्या पूर्वी उच्च न्यायालयातून जामिनावर बाहेर आला. जेलमधून सुटलेल्या सुदाम मुंडेने परळीपासून तीन किलोमीटर अंतरावर शेतात दवाखाना सुरू केला. सुदाम मुंडेच्या बेकायदेशीर दवाखान्याची राष्ट्रवादीचे आमदार संजय दौड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी रेड करण्याची योजना आखली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram