BEED : अंबाजोगाईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 2 पोलीस कर्मचाऱ्यांनीही अत्याचार केल्याची माहिती
Continues below advertisement
बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गेल्या 6 महिन्यात अनेकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं कळतंय. या मुलीचं न कळत्या वयात लग्न झालं होतं मात्र सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून ही मुलीनं घर सोडलं. मात्र तिचे हाल तिथे संपले नाहीत. बेघर असलेल्या या मुलीवर गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. अखेर एका महिलेनं तिची चौकशी केली आणि त्यात हे दाहक वास्तव समोर आलंय. या मुलीनं दिलेल्या जबाबानुसार बीड पोलिसांनी 4 जणांना अटक केलेय. या मुलीला सध्या बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आलंय.
Continues below advertisement