Beed | बीडमधील महानुभव पंथाच्या आश्रमातून मुलीला पळवलं,40वर्षीय व्यक्तीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
बीड शहराजवळील महानुभाव पंथाच्या आश्रमातून एका 14 वर्षीय मुलीला 40 वर्षाच्या व्यक्तीने पळवून नेले. या प्रकरणाची माहिती आश्रमाने पोलिसांना कळवली नाही. अखेर त्या मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आणि हा प्रकार समोर आला. या आश्रमातून बारा मुलांची सुटका केली त्यात सात मुली आहेत विशेष म्हणजे हे सगळे जण अल्पवयीन आहेत. या लहान मुलांतील कुणाचा आजार बरा होत नव्हता म्हणून देवासाठी सोडले होते तर कुणाला घराच्या भल्यासाठी देवाजवळ आणून सोडले होते.