Beed Crime : बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 51 लाखांची बेहिशेबी रक्कम हस्तगत
Beed Crime New : बीड पोलिसांनी हवाला रॅकेटचा पर्दाफाश केलाय. बीड शहरात तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 51 लाखांची बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आलेय. आयकर चुकवून टोकन पद्धतीनं पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याची कुणकुण पोलिसांन मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी हे छापे टाकले. छापे टाकलेल्या ठिकाणी सापडलेल्या रकमेचा हिशेेब संबंधितांना मिळाला नसल्यानं ही कारवाई करण्यात आली.