ABP News

पोलिसांनी पकडलेला ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न, सोलापूर-सांगोला एसटी स्थानकाजवळ वाळू माफियांचा हैदोस

Continues below advertisement
पंढरपूर : सांगोल्यात पोलिसांनी पकडून एसटी स्टँडच्या गोडावूनमध्ये ठेवलेला ट्रॅक्टर वाळू माफियांच्या माणसाने पळवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर पळवून नेत असताना न आवरल्याने सांगोल्याच्या मुख्य रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाल्याचं अनुभवायला मिळाले. पोलिसांनी आता या अज्ञात माफियांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रॅक्टरच्या धडकेमुळे 3 ते 4 दुकाने व एका मोटारसायकलचं नुकसान झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram