Atiq Ahmed Son Asad Ahmed Encounter : गोळीला गोळीनं उत्तर...अतिकच्या मुलाचा एनकाउंटर ABP Majha
Atiq Ahmad Son Encounter: कुख्यात गँगस्टर अतीक अहमदच्या मुलाचं आणि आणखी एका शूटरचं एन्काऊंटर झालंय. असद असं अतीकच्या मुलाचं नाव आहे. उमेश पाल खून (Umesh Pal Murder Case) प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. याच प्रकरणात गुलाम नावाचा शूटर सह-आरोपी होता. त्याचाही एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं झाशीमध्ये (Jhansi) ही कारवाई केली. या दोघांकडून परदेशी बनावटीची शस्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत.