नोकरीत परत घेण्यासाठी दोन कोटी तर कारवाई न करण्यासाठी 50 लाखांची मागणी, परमबीर सिंग यांच्यावर आरोप
एकीकडे वाझे प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करुन खळबळ माजवणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पोलीस दलातीलच एका अधिकाऱ्यानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. डर्टी बन्स सोबो या पबवर केलेल्या कारवाईच्या रागातून परमबीर सिंह यांनी निलंबन केल्याचा आरोप गावदेवीचे पोलीस निरीक्षक अनुप डांगेंनी केलाय. परमबीर सिंह यांच्या नावे आपल्याला नोकरीत परत घेण्यासाठी २ कोटी तर कारवाई होऊ नये यासाठी ५० लाखांची मागणी केल्याचा आरोप अनुप डांगेंनी केलाय. याविषयी डांगे यांनी २ फेब्रुवारीला गृहसचिवांकडे लेखी तक्रार केली आणि त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.
Tags :
CM Uddhav Thackeray Bmc Anil Deshmukh Home Minister Anil Deshmukh Mumbai Police Commissioner Parambir Singh Sachin Vaze Sachin Waze Mansukh Hiran Death Mansukh Hiran Parambir Singh Letter Paramveer Singh Mansukh Hiran Murder