Palghar Crime : उन्नती फायनान्स कंपनीतील कर्मचारी योगेश भोईरचा कंपनीला गंडा घालण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

कंपनीला गंडा घालण्यासाठी स्वतःवर दरोडा पडल्याची खोटी तक्रार देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला सफाळे पोलिसांनी त्याच्या एका साथीदारासह बेड्या ठोकल्या आहेत . उन्नती फायनान्स कंपनीत पैसे कलेक्शन  करणाऱ्या योगेश भोईर या कर्मचाऱ्याने आपल्यावर सफाळे घाटात दिवसा दरोडा पडला असून यात दरोडेखोरांनी एक लाख वीस हजार रुपये आणि मोबाईल चोरल्याची तक्रार सफाळे पोलीस ठाण्यात दिली होती . मात्र तपासात हा सगळा बनाव उघड झाला असून या कर्मचाऱ्यासह त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करून सफाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram