Ahmednagar : अहमदनगर : कर्जाच्या जाचाला कंटाळून तिघांची आत्महत्या, चिमुकलीसोबत पती-पत्नीनं दिला जीव

एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीये. नगर मधील केडगाव येथे राहणाऱ्या संदीप फाटक आणि पत्नी किरण फाटक यांनी त्यांच्या 10 वर्षीय मुलगी मैथिली हिला गळफास देऊन नंतर स्वतः गळफास घेऊन आपल्या राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना फाटक यांची सुसाईड नोट देखील मिळाली. संदीप फाटक हे व्यावसायिक होते. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आणि कर्ज वाढल्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सध्या याप्रकारणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार लहान मुलीचा खून केल्या प्रकरणी मृत आई वडील यांच्या वर खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola