अभिनेता अक्षय कुमारचा युट्यूबरवर 500 कोटींचा दावा, सुशांत आत्महत्येप्रकरणी अक्षयचे फेक व्हिडीओ शेअर
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एका यूट्यूबरवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या यूट्यूबरचे नाव राशिद सिद्दीकी असून, त्याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेक व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये अक्षय कुमारवर रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्याने व्हिडीओद्वारे केला होता.अक्षय सुशांतला ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट मिळाल्याने खुश नसल्याचा दावा राशिदने व्हिडीओमध्ये केला आहे. गेल्या चार महिन्यांत युट्यूबवर राशिदने सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून तब्बल 15 लाख रुपयांवर कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.