Sushant Singh Rajput चा मित्र Kunal Jani याच्या माहितीनंतर क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर कारवाई
NCB Raid On Cruise Party: मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आता एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह दहा लोकांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ टर्मिनलवरुन एक क्रूझ लक्ष्यद्वीपकडे जाणार होती. ज्यात एनसीबी अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती आहे. या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे काही जणांना घेऊन एनसीबी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती आहे.