Mohsin Sheikh Case : मोहसीन शेखच्या हत्या प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता

मोहसीन शेखचा सख्खा भाऊ मोबीन यांच्यासह चारही साक्षीदार फितूर झाल्यामुळं सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची सुटका करण्यात आली. मोहसीन शेखची जून २०१४मध्ये पुण्यातील हडपसर भागात हत्या करण्यात आली होती. मोहसीन त्यावेळी पठाणी ड्रेस आणि गोल टोपी घालून आपला भाऊ आणि मित्रांसह नमाज पढण्यासाठी गेला होता. त्यावेळी सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यात आल्यामुळं निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीनची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola