VIDEO | ब्रेकडान्सिंग आणि बरंच काही! अभिनेता पुष्कर जोगशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

काही नृत्यप्रकार असे असतात ज्याची काळानुरूप क्रेझ वाढतच जाते. आणि ती इतकी वाढते की तो नृत्यप्रकार क्रिडा स्पर्धांमध्ये घ्यावा का असा विचार सुरू होतो. ब्रेकडान्सिंगच्या बाबतीतही हेच झालं. २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्तानं ब्रेकडान्सिंगला आता ऑलिम्पिक खेळाचा दर्जा मिळणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख टोनी एस्टान्गिट यांनी हे स्पष्ट केलंय.

१९७० साली अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये ब्रेकडान्सिंगला सुरुवात झाली. आणि त्यानंतर जगभर त्याचा प्रसार झाला. विशेषकरुन तरुणाईमध्ये ब्रेकडान्सिंगची मोठी क्रेझ आहे. आता ब्रेकडान्सिंग हा नृत्यप्रकारही त्यातली कलात्मकता आणि प्रेक्षणीयता या मुद्यांवर ऑलिम्पिक चळवळीत सामील होत आहे. २०१८ साली ब्युनोस आयर्समध्ये झालेल्या युवा ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचा समावेश करण्यात आला होता. आता ब्रेकडान्सरसाठी ही आनंदाची बातमी असताना मराठी कलावंत आणि डान्सर तरी कसे मागे राहातील. तर आज आपल्यासोबत आहे अभिनेता आणि डान्सर पुष्कर जोग.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola