Zee आणि Sony Pictures चे विलीनीकरण; पुनित गोयंका पाच वर्षांसाठी CEO
झी एन्टरटेनमेन्ट बोर्डने सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या दोन कंपन्यांमध्ये झालेली ही मेगा डील तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 11,615 कोटी रुपयांची असून यामध्ये सोनी पिक्चर्सकडे मेजॉरिटी शेअर्स (52.93 टक्के) असणार आहेत. या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर पुनित गोयंका हे पुढील पाच वर्षांसाठी एमडी आणि सीईओ असतील.