कोरोनाच्या संकटातही संधीचं सोनं! नागपुरातील आयटी कंपनीत अमेरिकी कंपनीची 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक

Continues below advertisement
नागपूर : कोरोना आणि त्यासोबत करण्यात आलेल्या अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. सध्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची चर्चा होत असताना काही व्यवसाय मात्र कमालीचे भरभराटीला आले आहेत. नागपूरचे आयटी तज्ञ विक्रम लाभे यांच्या भारतीय स्टार्टअप आयटी कंपनी "फाईव्हट्रन"मध्ये लॉकडाउनच्या काळात तब्बल 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 750 कोटींची परकीय गुंतवणूक आली आहे. अँडरसन हॉवर्डस नावाच्या मोठ्या अमेरिकी गुंतवणूक कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे अँडरसन हॉवर्डसने याच्या आधी फेसबुक, इंस्टाग्रामसह इतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram