Stock Market | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी
Continues below advertisement
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे. या विषेश पॅकेजच्या घोषणेचा परिणाम आज थेट भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सरुवातीला प्री ओपन ट्रेड मध्ये सेन्सेक्स 1600 अंकांपेक्षा जास्त तर निफ्टी 468 अंकांनी सुरुवात झाली.
आज सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारलेला पाहायला मिळाला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 962.06 अंकांनी म्हणजेच 3.07 टक्क्यांनी वधारत 32,333.18 वर बाजाराला सुरुवात झाली. सुरुवातील निफ्टीमध्ये 315.85 अंकांनी म्हणजे 3.43 टक्क्यांनी वधारत 9512 वर बाजाराला सुरुवात झाली.
Continues below advertisement