Stock Market Down | शेअर बाजारात 1000 अंकांची घसरण, निफ्टीमध्ये 300 अंकांची घसरण
मुंबई: जागतिक शेअर मार्केटमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव खाली आल्यानंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची घसरण पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या शेअर निर्देशांक 49,950.75 अंकांवर घसरला होता. नंतर त्यात काही सुधारणा होऊन तो पुन्हा 50,112.10 वर पोहचला. निफ्टीही 270.40 अंकांनी घसरल्याने ती 14,826.95 अंकावर पोहोचली.