Adani Group Crisis : गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठा धक्का, 3 कंपन्यांवर शेअर बाजाराची देखरेख

अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च पंपनीच्या अहवालामुळे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला रोज हादरे बसत आहेत... आता या प्रकरणात रिझर्व्ह बँकेने उडी घेतली असून, अदानी उद्योग समुहातील कंपन्यांना कर्ज देणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या बँकांची चौकशी करण्यात येणार आहे...यात एसबीआय, एलआयसीचीही चौकशी होणार आहे..  बँकांकडून याबाबत आरबीआयने माहिती मागविली आहे....तसंच नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून अदानी समूहातील तीन कंपन्यांवर करडी नजर राहणार आहे...  गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी ॲडिशनल सर्वेलन्स मेजर्स अंतर्गत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय... अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट आणि अंबुजा सिमेंट या कंपनींना एएसएममध्ये टाकलं गेलंय .. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola