Share Market : शेअर बाजारात पुन्हा ब्लॅक मंडे, Nifty 427 पॉईंट्सने तर Sensex 1456 पॉईंट्सने घसरला
Continues below advertisement
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये आज तब्बल १ हजार ४५० अंकांची पडझड झालीये तर निफ्टी 427 अंकांनी खाली आलाय. अमेरिकेत सध्या महागाई दर सर्वाधिक आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटताना दिसतायत. तसच भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर गेलाय. त्याचबरोबर क्रुड ऑईलच्या वाढत्या दरांचाही परिणाम शेअर मार्केटवर बघायला मिळतोय.. त्यामुळे येत्या काही दिवसात बाजार अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
Continues below advertisement