Reserve Bank Of India : 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची डिजिटल रुपी सुरु
Reserve Bank Of India : गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल रुपीचा वापर प्रथम मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल. क्रिप्टोकरन्सीच्या वाढतं प्रस्थ आणि जोखीम पाहता सरकारने अर्थसंकल्पात डिजिटल चलन आणण्याची घोषणा केली होती.