RBI चा बँकांना झटका ; ATM मध्ये नोटा नसतील तर बँकांना आर्थिक दंड भरावा लागणार ABP Majha
Continues below advertisement
१ ऑक्टोबरपासून सर्व बँकांना आपापल्या एटीएममध्ये नोटा आहेत ना, याची खात्री करावी लागणार आहे. कारण एका महिन्यात १० तास किंवा त्याहून अधिक काळ जर एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसतील तर संबंधित बँकेला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. देशभरात २ लाखापेक्षा जास्त एटीएम आहेत. तरी, एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्यानं लोकांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्याकरिता, एटीएममध्ये नोटांची उपलब्धता व्हावी आणि एटीएम यंत्रणा आणखी सक्षम करण्याच्या हेतूनं आरबीआयनं हा मोठा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement